Skip to main content

Posts

Featured

आंबेडकरवादी प्रतिभावंत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्या तोडीचा विचारवंत नेता उदयाला आलेला नाही; परंतु बाबासाहेबांच्या वैचारिक वारश्यात अनेक प्रतिभावंतांनी निष्ठेने आपल्या  साहित्यिक व वैचारिक भूमिका समाजाला समर्पित केल्या.  प्रत्येक प्रतिभावंताची शैली वेगळी, क्षमता वेगळी.  पण प्रत्येकाचे योगदान डॉ. आंबेडकरांच्या निष्ठेतून रुजण्याने मराठी वाङ्मयाचा परिप्रेक्ष प्रभावित झाला.  आंबेडकरी पर्व आणि त्याचा वारसा वजा करून मराठी वाङ्मयीन विश्व पूर्ण होणारच नाही. शिवाय याच प्रवाहाच्या प्रेरणेतून उपेक्षितांचे अनेक वाङ्मयीन प्रवाहसुद्धा नव्या जाणिवेतून पुढे आले.  आता एकूणच मराठी सांस्कृतिकता संवादी पर्वाचे नवे भान पेलून एकात्म व्हावी! त्यासाठी विवेकी औदार्य आणि मानवकेंद्री सत्यनिष्ठेची गरज आहे.
आंबेडकरवादी प्रतिभावंत लेखक : डॉ. श्रीपाल सबनीस रु.250/- चेतक बुक्स, पुणे ISBN : 978-93-88009-35-5

Latest posts

‘फकिरा’ कादंबरीचे इहवादी मूल्यमापन

अती सूक्ष्म कथा

#कवितासंग्रह #मराठीकविता #चेतकबुक्स

IMAGES 0001

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मावळत्या संमेलनाध्यक्षाचे आत्मकथन साहित्य संमेलनात वाचायला मिळणार !