Tuesday 14 November 2017

#कवितासंग्रह #मराठीकविता #चेतकबुक्स

‘कोंडमारा’ हा सौ. वंदना हुळबत्ते यांच्या एकूण संकलित केलेल्या कवितांचा पहिलावहिला संग्रह आहे. त्यामुळे यात पहिल्या लेखनाच्या खाणाखुणा जाणवणे हे तसे स्वाभाविक म्हटले पाहिजे. तशा त्या आपल्याला जाणवतीलच. पण त्याचबरोबर आणि त्याच वेळी आपणास त्यांच्या कवितेतील साधकबाधक गुणवत्तेची पण जाणीव होऊन आनंद वाटेल असे वाटते. साधकबाधक याकरिताच म्हणावेसे वाटते की, त्यांच्याठायी कवितेची, म्हणजेच कवितेच्या विषयाची आणि रचनेची अशी एक अंतर्गत जाण आहे हेही त्याचवेळी जाणवेल. त्यांची काव्यरचना त्या अर्थाने कोणत्याही रसिकाला आशादायक वाटावी अशीच आहे. भविष्यात त्यांची ही समज आणखीनच गती घेऊ शकेल असा विश्‍वास प्रकट करण्याइतपत ही समज आढळून येते. त्यांचा हा काव्यसंग्रह आपणास हेच सांगतो आहे. या संग्रहाला कोंडमारा हे शीर्षकच अत्यंत सार्थ आहे असे वाटते. हा कोंडमारा केवळ व्यक्तिगत पातळीवरील नसून त्याचवेळी तो सामाजिक स्तरावरीलपण आहे. हा एक प्रकारचा स्त्रीमनाचा, स्त्रीजाणिवांचा कोंडमारा आहे.
- वैजनाथ महाजन
चेतक बुक्स, पुणे 30.

#कवितासंग्रह  #मराठीकविता  #चेतकबुक्स

Saturday 4 November 2017

मराठी कविता संग्रह

मराठी कविता संग्रह

माणूस माणसापासून दूर गेला. पुन्हा तो व्यवहारी व स्वमग्न बनला. कधी कधी तो सैरभैर वाटतो. अस्वस्थ वाटतो.
कल्पनासृष्टी आणि वास्तव या दुविधांची सर्कस सुरू होते. कधी कधी ह्या खेळात व्यवहाराचा विजय होतो तर कल्पनासृष्टीचा पराभव. कधीकधी जीवघेण्या आघातानं मन व्याकुळ होतं. शेवटी अशा व्यवहारांपासून सुटका करून घ्यावी असं वाटतं.
अशा अस्वस्थ वर्तनांची विभ्रम, स्पंदने टिपली आहेत या कविता संग्रहात

कवी : प्रा. झुंजार माने
मूल्य 140


चेतक बुक्स्, पुणे 30


संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज हे जगप्रसिद्ध आहेत ते त्यांच्या ज्ञानेश्‍वरी या ग्रंथामुळे. खरे तर ज्ञानेश्‍वरी हे नाव संत ज्ञानेश्‍वरांनी दिलेले नाही. त्यांनी नाव दिले ते “भावार्थ दीपिका”. पण काळाच्या ओघात लोकांनी त्या ग्रंथाचे नाव ज्ञानेश्‍वरी ठेवले आणि तेच लोकप्रिय झाले. संत ज्ञानेश्‍वरांनी, भगवदगीतेवरील ग्रंथ ज्ञानेश्‍वरी व्यतिरिक्त अमृतानुभव, हरिपाठ, चांगदेव पासष्टी व अनेक अभंग लिहिले आहेत. संत ज्ञानदेव महाराजांचे अभंग अतिशय उच्च दर्जाचे, गूढ अर्थाचे व समजण्यास कठीण असे आहेत. त्यामुळे ते फारसे लोकप्रिय नाहीत. पण त्याचा अर्थ समजला तर ते हृदयात कायमचे कोरले जातील. भक्तीतील उच्च दर्जाची अवस्था प्राप्त झाल्यावर जे अनुभव येतात ते अनुभव संत ज्ञानेश्‍वरांनी अभंगातून व्यक्त केले आहेत. संत ज्ञानेश्‍वरांचे 100 अभंग आज उपलब्ध आहेत. त्यातील महत्त्वाच्या व लोकप्रिय अभंगांचे निरुपण या ग्रंथात केले आहे.

चेतक बुक्स्, पुणे 30
250
मोबाईल : 9822280424


#ज्ञानेश्‍वर #निरुपण #चेतकबुक्स्

Monday 30 January 2017

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मावळत्या संमेलनाध्यक्षाचे आत्मकथन साहित्य संमेलनात वाचायला मिळणार !

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष श्रीपाल सबनीस आपल्या पदाची सूत्रे डोंबिवलीत नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्याकडे सोपवतील. त्याचवेळी संमेलनाला जमलेल्या रसिकांच्या हातात सबनीस यांची आत्मकथाही असेल. अर्थात हे पुस्तक त्यांचं आत्मचरित्र किंवा चरित्र नसेल तर साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांना कुठले अनुभव आले याचा लेखाजोखा या पुस्तकात असेल.
पुण्यातील ‘चेतक बुक्स’ या संस्थेच्या वतीने ‘संमेलनाध्यक्षाची आत्मकथा’ हे पुस्तक डोंबिवली इथं होणार्‍या 90 व्या संमेलनात प्रकाशित होत आहे. पिंपरीत झालेल्या व पी. डी. पाटील स्वागताध्यक्ष असलेल्या 89 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सबनीस होते. सबनीस यांचं नाव ते संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभं राहिल्यापासूनच गाजायला लागलं. ते अध्यक्ष झाल्यावर तर त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी ते वर्षभर चर्चेत राहिले. सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर तर सबनीस यांची चर्चा सगळीकडेच झाली. त्यांना पोलीस संरक्षणही पुरवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या त्यांच्या वक्तव्यानं तर संमेलनासमोरच प्रश्‍नचिन्ह उभं राहिलं. देशभर हा वाद गाजला. पुढे हा वाद मिटला, पण त्यानंतरही अनेक वाद झाले. सबनीस यांनी धैर्याने अनेक वादांना तोंड दिले. आपली भूमिका नेटानं मांडली.
संमेलनाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी राज्यातच नाही तर राज्याबाहेरही प्रवास केला. अनेक व्याख्याने दिली. या 14 महिन्यांच्या कालखंडाचा प्रवास त्यांनी या पुस्तकात मांडला आहे. काही वृत्तपत्रे आणि वाहिन्यांवरील काही मंडळींनी त्यांना अकारण टीकेचं लक्ष्य केलं होतं. त्याचा त्यांना कसा त्रास झाला त्याबद्दल त्यांची बाजू काय या सगळ्याचा उलगडा या पुस्तकातून होणार आहे.
यापूर्वी काही साहित्य संमेलनाध्यक्षांनी आपले अनुभव सांगितले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी स्वागताध्यक्ष आणि संमेलनाध्यक्ष पदावरचे अनुभव सांगणारी स्वतंत्रच पुस्तके लिहिली आहेत. अन्य मान्यवरांनीही आपले अनुभव सांगितले आहेत. मात्र सबनीस आपल्या पदाची सूत्रे दुसर्‍याकडे सोपवतानाच म्हणजे अध्यक्षपदाची सूत्रे खाली ठेवतानाच आपला प्रवास सांगत आहेत. यात त्यांनी त्यांच्यावर अन्याय करणार्‍या मंडळींवर सडेतोड लिहिले आहे.
साहित्य महामंडळाच्या तत्कालीन अध्यक्ष माधवी वैद्य आणि अन्य पदाधिकारी तसेच साहित्यक्षेत्रातील काही मंडळींच्या वागणुकीचाही त्यांनी समाचार घेतला आहे. हे पुस्तक अनेक बाबींवर वेगळा प्रकाश टाकणारे ठरेल

नीतिशास्त्र, सत्यनिष्ठा आणि अभिवृत्ती

 नीतिशास्त्र, सत्यनिष्ठा आणि अभिवृत्ती  UPDATED ON 10 JAN 2023