Wednesday, 8 June 2022

वाडगं : आत्मकथन : अनिल भालेराव

 वाडगं

(आत्मकथन)

अनिल भालेराव

या आत्मकथनाची अनेक वैशिष्टे आहेत. साधी सोपी सरळ संवादी भाषा
आणि जे काही अनुभवले त्याचे प्रामाणिक स्पष्ट निवेदन.
व्यवस्थेविरोधात आक्रोष देखील संयमी आहे.
उगीच शब्दखेळ आणि रंगीत चित्रण नाही.
त्यात एक तटस्थता आणि प्रामाणिकपणा दिसून येतो.
त्यामुळे सारी पात्र वाचकाला भेटल्यासारखी वाटतात.
खानदेश आणि मराठवाडा भागातील बोलीचा संवादी उपयोग आहे.
या भाषेतील अनेक शब्दांचे भावार्थ दिल्याने वाचकाला त्याचे
अर्थ कळण्यास मदत होते.



Monday, 11 October 2021

आपला कवितासंग्रह प्रकाशित करा

 


आपला कवितासंग्रह प्रकाशित करा

‘चेतक बुक्स्’तर्फे कवींसाठी कवितासंग्रह प्रकाशित करण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी काही खास योजना आणत आहोत. या अंतर्गत सर्व प्रकारच्या कवितासंग्रहांचे प्रकाशन, तसेच विषयवार प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित करण्यात येणार आहेत. प्रमाण मराठी सोबतच इतर बोली भाषांमधील कवितांचे संग्रहही प्रकाशित केले जाणार आहेत.

 योजनेचा उद्देश

व्यक्त होण्यासाठी कविता हा सर्वात सुंदर आणि प्रत्येकालाच जवळचा वाटणारा साहित्य प्रकार. मात्र इतर ललित साहित्य प्रकारांप्रमाणे कवितांचे पुस्तकरुपात प्रकाशित होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. यामागे विविध कारणे आहेत ज्यात वाचकांची कवितासंग्रह विकत घेण्यामागची मानसीकता, निर्मितीचा दर्जा, टीका, प्रकाशनानंतर येणार्‍या व्यावसायिक मर्यादा आणि इतर. फारच मोजक्या कवींच्या कविता लोकांपर्यंत पोहोचतात. बहुतेकदा वाचनालये, कॉलेज यांच्याकडूनही कवीतासंग्रंहांची खरेदी होताना दिसत नाही.

अशा कारणांमूळे अनेक कवींच्या कविता या अप्रकाशितच राहतात. कालांतराने अनेकजण लिखाणच बंद करतात. अशा कवींना प्रोत्साहन मिळावं म्हणून कविता पुस्तकाच्या स्वरुपात प्रकाशित करणं आणि त्या नवनव्या मार्गांनी वाचक, संस्था, ग्रंथालये यांपर्यंत पोहोचविणे हा या योजनेचा उद्देश आहे.

 

योजना

योजने अंतर्गत सर्व प्रकारच्या आणि विषयांवरील कवितासंग्रह प्रकाशित केले जातील. मात्र या कविता आपल्या स्वत:च्या असणे बंधनकारक आहे. कवितासंग्रह प्रकाशनासाठी स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा निर्णय प्रकाशकाचा राहील. हा निर्णय आमच्याकडे कविता आल्यावरती 15-20 दिवसांत आपणाला कळविण्यात येईल. कविता संग्रह स्वीकारल्यास 90 ते 120 दिवसांत याचे प्रकाशन मुद्रित पुस्तक तसेच ई-बुक स्वरूपात केले जाईल. 

बालकवितासंग्रह

पृष्ठ संख्या : 32 पानांपर्यंत (सचित्र एक रंगी)

रु. 9999/-

कवींना मिळणारे फायदे : संग्रहाच्या 100 प्रती

 

कवितासंग्रह

पृष्ठ संख्या : 80 पानांपर्यंत

रु. 9999/-

कवींना मिळणारे फायदे :  संग्रहाच्या 100 प्रती

 

प्रातिनिधिक कवितासंग्रह :

ज्या कवींकडे  पुढील विषयांवरील रचना असतील त्यांचा प्राधान्याने कवितासंग्रहांसाठी विचार केला जाईल. विषय पुढील प्रमाणे : माझा देश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, निसर्ग, शेतकरी, चळवळ, ग्रामीण पार्श्वभूमी, बाबा, आई, मैत्री, प्रेम, शिक्षण, इ.

प्रातिनिधिक कवितासंग्रह

पृष्ठ संख्या : 80

प्रत्येक कवीच्या निवडक दोन ते तीन कवितांचा समावेश या संग्रहात असेल

कवींना संग्रहाची 1 प्रत प्रकाशनानंतर देण्यात येईल



 

सर्व पुस्तकांना ISBN क्रमांक असेल. फेसबूक, इन्स्टाग्राम, ब्लॉगच्या माध्यमातून कवितासंग्रहाची जाहिरात मर्यादित कालावधीसाठी करण्यात येईल. प्रकाशनानंतर अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, इतर ऑनलाईन तसेच काही वितरकांच्या माध्यमांतून पुस्तके वाचकांपर्यंत पोहचवीली जातील.

योजनेअंतर्गत कवितासंग्रह प्रकाशित करण्यासाठी आपल्या कवितांची टाईप केलेली फाईल/ हस्तलिखिताची झेरॉक्स, सोबत आपला पत्ता व संपर्क क्रमांक आमच्याकडे पाठवावा.

पत्ता : ‘चेतक बुक्स’ 1280, ए विंग, 1, हरिनारायणस्मृती सहकारी गृहरचना संस्था मर्या., सदाशिव पेठ, पुणे 411030. संपर्क : 8407940373 इमेल : chetakbooksbusiness@gmail.com


#chetakbooks #bookpublisher #पुस्तक प्रकाशक #कविता संग्रह प्रकाशन #मराठी कविता संग्रह #मराठी कवी #मराठी बुक पब्लिशर्स #कविता #मराठी #Where to publish Marathi Kavita #How I can publish my Marathi poems? #Where to publish your poetry #Marathi Poems #Self-publishing companies #Marathi Book Publishers #Top Marathi Book Publishers #List of publishers of books in Marathi # marathi book publishers in pune #Marathi Language Publishers #Book Publisher In Pune #how to publish marathi book #marathi kavita publisher


Saturday, 21 July 2018

आंबेडकरवादी प्रतिभावंत

आंबेडकरवादी प्रतिभावंत

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

लेखक : डॉ. श्रीपाल सबनीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्या तोडीचा विचारवंत नेता उदयाला आलेला नाही;
परंतु बाबासाहेबांच्या वैचारिक वारश्यात अनेक प्रतिभावंतांनी निष्ठेने आपल्या 
साहित्यिक व वैचारिक भूमिका समाजाला समर्पित केल्या. 
प्रत्येक प्रतिभावंताची शैली वेगळी, क्षमता वेगळी. 
पण प्रत्येकाचे योगदान डॉ. आंबेडकरांच्या निष्ठेतून रुजण्याने मराठी वाङ्मयाचा परिप्रेक्ष प्रभावित झाला. 
आंबेडकरी पर्व आणि त्याचा वारसा वजा करून मराठी वाङ्मयीन विश्व पूर्ण होणारच नाही.
शिवाय याच प्रवाहाच्या प्रेरणेतून उपेक्षितांचे अनेक वाङ्मयीन प्रवाहसुद्धा नव्या जाणिवेतून पुढे आले. 
आता एकूणच मराठी सांस्कृतिकता संवादी पर्वाचे नवे भान पेलून एकात्म व्हावी!
त्यासाठी विवेकी औदार्य आणि मानवकेंद्री सत्यनिष्ठेची गरज आहे.

रु.250/-

चेतक बुक्स, पुणे

ISBN : 978-93-88009-35-5


Thursday, 12 July 2018

‘फकिरा’ कादंबरीचे इहवादी मूल्यमापन

शाहीर अण्णा भाऊ साठे :

यांचे वाङ्मयीन योगदान सर्वार्थाने श्रेष्ठ व मोलाचे असूनही सर्वांनीच त्याची अक्षम्य उपेक्षा केली. मागास जातीचा जन्मसंदर्भ आणि कॉम्रेडची वैचारिक नाळ, यामुळे या बहुआयामी प्रतिभावंताला सांस्कृतिक वनवास भोगावा लागला.
कथा-कादंबरी, वगनाट्य, पोवाडे-गाणी, चित्रपटकथा अशा सर्वच वाङ्मयीन प्रकार व प्रवाहात आण्णाभाऊंच्या अस्सल प्रतिभेने सांस्कृतिक योगदान दिले. मराठी माती-संस्कृती व माणसाला समर्पित झालेली या शाहिराची प्रतिभा व प्रज्ञा प्रेरक व मार्गदर्शक आहे. या अव्वल प्रतिभेचा सर्वांगसुंदर आविष्कार म्हणजे त्यांची फकिरा कादंबरी!
 ‘फकिरा’ची वाङ्मयीन उंची मराठी कादंबरी विश्वाचे बहुसांस्कृतिक वैभव आहे.
- डॉ. श्रीपाल सबनीस

#फकिरा कादंबरी #chetakbooks #chetakbook

Saturday, 7 July 2018

मराठी लघुकथा संग्रह : अती सूक्ष्म कथा

मराठी लघुकथा संग्रह

अती सूक्ष्म कथा


जगायचं विसरलेल्या,
लख्ख प्रकाशात 
दिवा घेऊन 
जगण्याचा 
प्रयत्न करणार्‍या 
नर-मादीच्या कथा...

कुणाल मदन हजेरी

रु.70

buy book at Amazon :

ATI SUKSHMA KATHA

by Chetak Books: https://www.amazon.in/dp/B0B4FY7GW5/ref=cm_sw_em_r_mt_dp_MTBDZVDP5NCZXNT7D6QH


#chetakbooks #marathibook #marathi book publisher #marathi story for reading 

Tuesday, 14 November 2017

#कवितासंग्रह #मराठीकविता #चेतकबुक्स

‘कोंडमारा’ हा सौ. वंदना हुळबत्ते यांच्या एकूण संकलित केलेल्या कवितांचा पहिलावहिला संग्रह आहे. त्यामुळे यात पहिल्या लेखनाच्या खाणाखुणा जाणवणे हे तसे स्वाभाविक म्हटले पाहिजे. तशा त्या आपल्याला जाणवतीलच. पण त्याचबरोबर आणि त्याच वेळी आपणास त्यांच्या कवितेतील साधकबाधक गुणवत्तेची पण जाणीव होऊन आनंद वाटेल असे वाटते. साधकबाधक याकरिताच म्हणावेसे वाटते की, त्यांच्याठायी कवितेची, म्हणजेच कवितेच्या विषयाची आणि रचनेची अशी एक अंतर्गत जाण आहे हेही त्याचवेळी जाणवेल. त्यांची काव्यरचना त्या अर्थाने कोणत्याही रसिकाला आशादायक वाटावी अशीच आहे. भविष्यात त्यांची ही समज आणखीनच गती घेऊ शकेल असा विश्‍वास प्रकट करण्याइतपत ही समज आढळून येते. त्यांचा हा काव्यसंग्रह आपणास हेच सांगतो आहे. या संग्रहाला कोंडमारा हे शीर्षकच अत्यंत सार्थ आहे असे वाटते. हा कोंडमारा केवळ व्यक्तिगत पातळीवरील नसून त्याचवेळी तो सामाजिक स्तरावरीलपण आहे. हा एक प्रकारचा स्त्रीमनाचा, स्त्रीजाणिवांचा कोंडमारा आहे.
- वैजनाथ महाजन
चेतक बुक्स, पुणे 30.

#कवितासंग्रह  #मराठीकविता  #चेतकबुक्स

Saturday, 4 November 2017

मराठी कविता संग्रह

मराठी कविता संग्रह

माणूस माणसापासून दूर गेला. पुन्हा तो व्यवहारी व स्वमग्न बनला. कधी कधी तो सैरभैर वाटतो. अस्वस्थ वाटतो.
कल्पनासृष्टी आणि वास्तव या दुविधांची सर्कस सुरू होते. कधी कधी ह्या खेळात व्यवहाराचा विजय होतो तर कल्पनासृष्टीचा पराभव. कधीकधी जीवघेण्या आघातानं मन व्याकुळ होतं. शेवटी अशा व्यवहारांपासून सुटका करून घ्यावी असं वाटतं.
अशा अस्वस्थ वर्तनांची विभ्रम, स्पंदने टिपली आहेत या कविता संग्रहात

कवी : प्रा. झुंजार माने
मूल्य 140


चेतक बुक्स्, पुणे 30


संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज हे जगप्रसिद्ध आहेत ते त्यांच्या ज्ञानेश्‍वरी या ग्रंथामुळे. खरे तर ज्ञानेश्‍वरी हे नाव संत ज्ञानेश्‍वरांनी दिलेले नाही. त्यांनी नाव दिले ते “भावार्थ दीपिका”. पण काळाच्या ओघात लोकांनी त्या ग्रंथाचे नाव ज्ञानेश्‍वरी ठेवले आणि तेच लोकप्रिय झाले. संत ज्ञानेश्‍वरांनी, भगवदगीतेवरील ग्रंथ ज्ञानेश्‍वरी व्यतिरिक्त अमृतानुभव, हरिपाठ, चांगदेव पासष्टी व अनेक अभंग लिहिले आहेत. संत ज्ञानदेव महाराजांचे अभंग अतिशय उच्च दर्जाचे, गूढ अर्थाचे व समजण्यास कठीण असे आहेत. त्यामुळे ते फारसे लोकप्रिय नाहीत. पण त्याचा अर्थ समजला तर ते हृदयात कायमचे कोरले जातील. भक्तीतील उच्च दर्जाची अवस्था प्राप्त झाल्यावर जे अनुभव येतात ते अनुभव संत ज्ञानेश्‍वरांनी अभंगातून व्यक्त केले आहेत. संत ज्ञानेश्‍वरांचे 100 अभंग आज उपलब्ध आहेत. त्यातील महत्त्वाच्या व लोकप्रिय अभंगांचे निरुपण या ग्रंथात केले आहे.

चेतक बुक्स्, पुणे 30
250
मोबाईल : 9822280424


#ज्ञानेश्‍वर #निरुपण #चेतकबुक्स्

Monday, 30 January 2017

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मावळत्या संमेलनाध्यक्षाचे आत्मकथन साहित्य संमेलनात वाचायला मिळणार !

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष श्रीपाल सबनीस आपल्या पदाची सूत्रे डोंबिवलीत नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्याकडे सोपवतील. त्याचवेळी संमेलनाला जमलेल्या रसिकांच्या हातात सबनीस यांची आत्मकथाही असेल. अर्थात हे पुस्तक त्यांचं आत्मचरित्र किंवा चरित्र नसेल तर साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांना कुठले अनुभव आले याचा लेखाजोखा या पुस्तकात असेल.
पुण्यातील ‘चेतक बुक्स’ या संस्थेच्या वतीने ‘संमेलनाध्यक्षाची आत्मकथा’ हे पुस्तक डोंबिवली इथं होणार्‍या 90 व्या संमेलनात प्रकाशित होत आहे. पिंपरीत झालेल्या व पी. डी. पाटील स्वागताध्यक्ष असलेल्या 89 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सबनीस होते. सबनीस यांचं नाव ते संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभं राहिल्यापासूनच गाजायला लागलं. ते अध्यक्ष झाल्यावर तर त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी ते वर्षभर चर्चेत राहिले. सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर तर सबनीस यांची चर्चा सगळीकडेच झाली. त्यांना पोलीस संरक्षणही पुरवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या त्यांच्या वक्तव्यानं तर संमेलनासमोरच प्रश्‍नचिन्ह उभं राहिलं. देशभर हा वाद गाजला. पुढे हा वाद मिटला, पण त्यानंतरही अनेक वाद झाले. सबनीस यांनी धैर्याने अनेक वादांना तोंड दिले. आपली भूमिका नेटानं मांडली.
संमेलनाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी राज्यातच नाही तर राज्याबाहेरही प्रवास केला. अनेक व्याख्याने दिली. या 14 महिन्यांच्या कालखंडाचा प्रवास त्यांनी या पुस्तकात मांडला आहे. काही वृत्तपत्रे आणि वाहिन्यांवरील काही मंडळींनी त्यांना अकारण टीकेचं लक्ष्य केलं होतं. त्याचा त्यांना कसा त्रास झाला त्याबद्दल त्यांची बाजू काय या सगळ्याचा उलगडा या पुस्तकातून होणार आहे.
यापूर्वी काही साहित्य संमेलनाध्यक्षांनी आपले अनुभव सांगितले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी स्वागताध्यक्ष आणि संमेलनाध्यक्ष पदावरचे अनुभव सांगणारी स्वतंत्रच पुस्तके लिहिली आहेत. अन्य मान्यवरांनीही आपले अनुभव सांगितले आहेत. मात्र सबनीस आपल्या पदाची सूत्रे दुसर्‍याकडे सोपवतानाच म्हणजे अध्यक्षपदाची सूत्रे खाली ठेवतानाच आपला प्रवास सांगत आहेत. यात त्यांनी त्यांच्यावर अन्याय करणार्‍या मंडळींवर सडेतोड लिहिले आहे.
साहित्य महामंडळाच्या तत्कालीन अध्यक्ष माधवी वैद्य आणि अन्य पदाधिकारी तसेच साहित्यक्षेत्रातील काही मंडळींच्या वागणुकीचाही त्यांनी समाचार घेतला आहे. हे पुस्तक अनेक बाबींवर वेगळा प्रकाश टाकणारे ठरेल

नीतिशास्त्र, सत्यनिष्ठा आणि अभिवृत्ती

 नीतिशास्त्र, सत्यनिष्ठा आणि अभिवृत्ती  UPDATED ON 10 JAN 2023