Friday, 24 June 2022

ट्रेंड्स इन इंडियन कल्चर अँड हेरिटेज : UPSC Books in Marathi

ट्रेंड्स इन इंडियन कल्चर अँड हेरिटेज 

(UPSC Books in Marathi)



 डॉ. औसफ सईद 

अनुवाद : सावनी केळकर 

सदर पुस्तक स्पर्धा परिक्षांच्या परिप्रेक्ष्यातून (व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ) भारतीय कला आणि संस्कृती हे महत्त्वाचे विषय हाताळते. यात वास्तुविद्या, संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला, चित्रपट, भाषा आणि साहित्य, सादरीकरणाच्या कला, कारागिरी, जत्रा, उत्सव, आणि धर्म आदीचा सर्वसमावेशक आणि प्रवाही शैलीत परामर्श घेतला आहे. भारतीय संस्कृतीच्या अभ्यासार्थ विद्यार्थ्यांना अनेक ग्रंथ वाचावे लागतात. तो वेळ आणि श्रम वाचवणे व विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी आवश्यक माहिती आटोपशीर आकारात देणे हा या पुस्तकाचा हेतू आहे. सिव्हील सर्व्हिसेस, आयएफएस, स्टेट पब्लिक सर्व्हिस, बीएसआरबी, आयकर आणि एक्साईज इन्स्पेक्टरसाठीच्या आणि इतर परिक्षा देऊ इच्छिणार्‍या उमेदवारांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. पुस्तकाचे तीन भाग आहेत. पहिल्या भागात भारतीय कला आणि संस्कृतीवर पंधरा प्रकरणे आहेत. दुसर्‍या भागात गेल्या वर्षी सांस्कृतिक क्षेत्रात झालेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आहे. तिसर्‍या भागात दहा आदर्श प्रश्नपत्रिका, प्रत्येकीत शंभर वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसह दिले आहेत. भारतीय संस्कृती आणि वारशाचा अभ्यास करू इच्छिणार्‍यांना देखील हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल. 

चेतक बुक्स, पुणे 30.

Wednesday, 22 June 2022

मराठी कविता संग्रह : मोशनल, मोटिव्हेशनल आणि इमोशनल

मराठी कविता संग्रह 

मोशनल, मोटिव्हेशनल आणि इमोशनल

(कविता संग्रह)

कवी : प्रा. झुंजार माने

मानवी मन नेहमी भावना व बुद्धी यांच्या हिंदोळ्यावर झुलत असते. आपण समाजात राहतो. तर्‍हेतर्‍हेच्या व्यक्ती व वल्ली भेटतात, हृदयात घर करतात. तसेच काही घटना मनाच्या पटलावर कायमच्या कोरल्या जातात. त्या ही ठरतात मोशनल, मोटिव्हेशनल तर कधी इमोशनलही करून जातात. कधी कधी घर, कुटुंब आणि आपल्या नोकरी व्यवसायामुळे सहवासात येणार्‍या व्यक्ती आपल्या स्वभावाला कारणीभूत ठरू शकतात काही प्रमाणात, कारण आपल्या अदीम प्रभावी प्रेरणाच आपले वर्तन निश्चित करत असतात. त्यावर महापुरुषांचाही प्रभाव असतो. त्यामुळे एकंदर जीवनाकडे व समाजाकडे पाहण्याची दृष्टी, विचार करण्याची पद्धत ठरते प्रेरक, ती तुम्हाला गतिशील बनवून जीवनात प्रवाही ठेवते तर भावनिक बनवून गुंतवूनही ठेवते स्वत:मध्ये. दोन्ही बाबी गतिशीलता आणि भावनिकता यांचे संतुलन जीवनाला आनंद देत असावेत. प्रवास तर करायलाच हवा, पण प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर प्रवासातील ठिकाणांजवळ थोडा विसावाही घ्यायला हवा.

चेतक बुक्स, पुणे 30.

Monday, 20 June 2022

मी 'न'कलाकार : प्रकाश पारखी

आत्मचरित्र




व्यक्तिमत्त्व विकासासाठी गरज असते गुरुची, शिक्षकांची, माता-पित्यांची.

याबरोबरच नाट्यप्रशिक्षण हे देखील व्यक्तिमत्त्व विकासात मोलाची कामगिरी करते.

प्रत्येक व्यक्ती एक कलाकार म्हणून जरी उदयास आली नाही तरी हे प्रशिक्षण जीवनातील विविध वाटांवरचा प्रवास करताना महत्त्वपूर्ण ठरेल. याच प्रवासासाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे प्रकाश पारखी आणि त्यांची संस्था 'नाट्यसंस्कार कला अकादमी' हे नाव केवळ पुण्यात, महाराष्ट्रातच नाही तर या आयामाबाहेरही सर्वदूर पसरले आहे. त्यांच्या घडण्याच्या आणि घडविण्याच्या प्रकियेचा हा अनुबंध म्हणजेच मी 'न'कलाकार हे पुस्तक होय. जीवनातील नाटकाचे महत्त्व अधोरेखित करण्यालाही हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

चेतक बुक्स्, पुणे 30.


#chetakbooks #marathibookpublisher #bookpublishersindia #marathibooks #prakashak #prakashan

Wednesday, 8 June 2022

वाडगं : आत्मकथन : अनिल भालेराव

 वाडगं

(आत्मकथन)

अनिल भालेराव

या आत्मकथनाची अनेक वैशिष्टे आहेत. साधी सोपी सरळ संवादी भाषा
आणि जे काही अनुभवले त्याचे प्रामाणिक स्पष्ट निवेदन.
व्यवस्थेविरोधात आक्रोष देखील संयमी आहे.
उगीच शब्दखेळ आणि रंगीत चित्रण नाही.
त्यात एक तटस्थता आणि प्रामाणिकपणा दिसून येतो.
त्यामुळे सारी पात्र वाचकाला भेटल्यासारखी वाटतात.
खानदेश आणि मराठवाडा भागातील बोलीचा संवादी उपयोग आहे.
या भाषेतील अनेक शब्दांचे भावार्थ दिल्याने वाचकाला त्याचे
अर्थ कळण्यास मदत होते.



Monday, 11 October 2021

आपला कवितासंग्रह प्रकाशित करा

 


आपला कवितासंग्रह प्रकाशित करा

‘चेतक बुक्स्’तर्फे कवींसाठी कवितासंग्रह प्रकाशित करण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी काही खास योजना आणत आहोत. या अंतर्गत सर्व प्रकारच्या कवितासंग्रहांचे प्रकाशन, तसेच विषयवार प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित करण्यात येणार आहेत. प्रमाण मराठी सोबतच इतर बोली भाषांमधील कवितांचे संग्रहही प्रकाशित केले जाणार आहेत.

 योजनेचा उद्देश

व्यक्त होण्यासाठी कविता हा सर्वात सुंदर आणि प्रत्येकालाच जवळचा वाटणारा साहित्य प्रकार. मात्र इतर ललित साहित्य प्रकारांप्रमाणे कवितांचे पुस्तकरुपात प्रकाशित होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. यामागे विविध कारणे आहेत ज्यात वाचकांची कवितासंग्रह विकत घेण्यामागची मानसीकता, निर्मितीचा दर्जा, टीका, प्रकाशनानंतर येणार्‍या व्यावसायिक मर्यादा आणि इतर. फारच मोजक्या कवींच्या कविता लोकांपर्यंत पोहोचतात. बहुतेकदा वाचनालये, कॉलेज यांच्याकडूनही कवीतासंग्रंहांची खरेदी होताना दिसत नाही.

अशा कारणांमूळे अनेक कवींच्या कविता या अप्रकाशितच राहतात. कालांतराने अनेकजण लिखाणच बंद करतात. अशा कवींना प्रोत्साहन मिळावं म्हणून कविता पुस्तकाच्या स्वरुपात प्रकाशित करणं आणि त्या नवनव्या मार्गांनी वाचक, संस्था, ग्रंथालये यांपर्यंत पोहोचविणे हा या योजनेचा उद्देश आहे.

 

योजना

योजने अंतर्गत सर्व प्रकारच्या आणि विषयांवरील कवितासंग्रह प्रकाशित केले जातील. मात्र या कविता आपल्या स्वत:च्या असणे बंधनकारक आहे. कवितासंग्रह प्रकाशनासाठी स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा निर्णय प्रकाशकाचा राहील. हा निर्णय आमच्याकडे कविता आल्यावरती 15-20 दिवसांत आपणाला कळविण्यात येईल. कविता संग्रह स्वीकारल्यास 90 ते 120 दिवसांत याचे प्रकाशन मुद्रित पुस्तक तसेच ई-बुक स्वरूपात केले जाईल. 

बालकवितासंग्रह

पृष्ठ संख्या : 32 पानांपर्यंत (सचित्र एक रंगी)

रु. 9999/-

कवींना मिळणारे फायदे : संग्रहाच्या 100 प्रती

 

कवितासंग्रह

पृष्ठ संख्या : 80 पानांपर्यंत

रु. 9999/-

कवींना मिळणारे फायदे :  संग्रहाच्या 100 प्रती

 

प्रातिनिधिक कवितासंग्रह :

ज्या कवींकडे  पुढील विषयांवरील रचना असतील त्यांचा प्राधान्याने कवितासंग्रहांसाठी विचार केला जाईल. विषय पुढील प्रमाणे : माझा देश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, निसर्ग, शेतकरी, चळवळ, ग्रामीण पार्श्वभूमी, बाबा, आई, मैत्री, प्रेम, शिक्षण, इ.

प्रातिनिधिक कवितासंग्रह

पृष्ठ संख्या : 80

प्रत्येक कवीच्या निवडक दोन ते तीन कवितांचा समावेश या संग्रहात असेल

कवींना संग्रहाची 1 प्रत प्रकाशनानंतर देण्यात येईल



 

सर्व पुस्तकांना ISBN क्रमांक असेल. फेसबूक, इन्स्टाग्राम, ब्लॉगच्या माध्यमातून कवितासंग्रहाची जाहिरात मर्यादित कालावधीसाठी करण्यात येईल. प्रकाशनानंतर अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, इतर ऑनलाईन तसेच काही वितरकांच्या माध्यमांतून पुस्तके वाचकांपर्यंत पोहचवीली जातील.

योजनेअंतर्गत कवितासंग्रह प्रकाशित करण्यासाठी आपल्या कवितांची टाईप केलेली फाईल/ हस्तलिखिताची झेरॉक्स, सोबत आपला पत्ता व संपर्क क्रमांक आमच्याकडे पाठवावा.

पत्ता : ‘चेतक बुक्स’ 1280, ए विंग, 1, हरिनारायणस्मृती सहकारी गृहरचना संस्था मर्या., सदाशिव पेठ, पुणे 411030. संपर्क : 8407940373 इमेल : chetakbooksbusiness@gmail.com


#chetakbooks #bookpublisher #पुस्तक प्रकाशक #कविता संग्रह प्रकाशन #मराठी कविता संग्रह #मराठी कवी #मराठी बुक पब्लिशर्स #कविता #मराठी #Where to publish Marathi Kavita #How I can publish my Marathi poems? #Where to publish your poetry #Marathi Poems #Self-publishing companies #Marathi Book Publishers #Top Marathi Book Publishers #List of publishers of books in Marathi # marathi book publishers in pune #Marathi Language Publishers #Book Publisher In Pune #how to publish marathi book #marathi kavita publisher


Saturday, 21 July 2018

आंबेडकरवादी प्रतिभावंत

आंबेडकरवादी प्रतिभावंत

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

लेखक : डॉ. श्रीपाल सबनीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्या तोडीचा विचारवंत नेता उदयाला आलेला नाही;
परंतु बाबासाहेबांच्या वैचारिक वारश्यात अनेक प्रतिभावंतांनी निष्ठेने आपल्या 
साहित्यिक व वैचारिक भूमिका समाजाला समर्पित केल्या. 
प्रत्येक प्रतिभावंताची शैली वेगळी, क्षमता वेगळी. 
पण प्रत्येकाचे योगदान डॉ. आंबेडकरांच्या निष्ठेतून रुजण्याने मराठी वाङ्मयाचा परिप्रेक्ष प्रभावित झाला. 
आंबेडकरी पर्व आणि त्याचा वारसा वजा करून मराठी वाङ्मयीन विश्व पूर्ण होणारच नाही.
शिवाय याच प्रवाहाच्या प्रेरणेतून उपेक्षितांचे अनेक वाङ्मयीन प्रवाहसुद्धा नव्या जाणिवेतून पुढे आले. 
आता एकूणच मराठी सांस्कृतिकता संवादी पर्वाचे नवे भान पेलून एकात्म व्हावी!
त्यासाठी विवेकी औदार्य आणि मानवकेंद्री सत्यनिष्ठेची गरज आहे.

रु.250/-

चेतक बुक्स, पुणे

ISBN : 978-93-88009-35-5


Thursday, 12 July 2018

‘फकिरा’ कादंबरीचे इहवादी मूल्यमापन

शाहीर अण्णा भाऊ साठे :

यांचे वाङ्मयीन योगदान सर्वार्थाने श्रेष्ठ व मोलाचे असूनही सर्वांनीच त्याची अक्षम्य उपेक्षा केली. मागास जातीचा जन्मसंदर्भ आणि कॉम्रेडची वैचारिक नाळ, यामुळे या बहुआयामी प्रतिभावंताला सांस्कृतिक वनवास भोगावा लागला.
कथा-कादंबरी, वगनाट्य, पोवाडे-गाणी, चित्रपटकथा अशा सर्वच वाङ्मयीन प्रकार व प्रवाहात आण्णाभाऊंच्या अस्सल प्रतिभेने सांस्कृतिक योगदान दिले. मराठी माती-संस्कृती व माणसाला समर्पित झालेली या शाहिराची प्रतिभा व प्रज्ञा प्रेरक व मार्गदर्शक आहे. या अव्वल प्रतिभेचा सर्वांगसुंदर आविष्कार म्हणजे त्यांची फकिरा कादंबरी!
 ‘फकिरा’ची वाङ्मयीन उंची मराठी कादंबरी विश्वाचे बहुसांस्कृतिक वैभव आहे.
- डॉ. श्रीपाल सबनीस

#फकिरा कादंबरी #chetakbooks #chetakbook

Saturday, 7 July 2018

मराठी लघुकथा संग्रह : अती सूक्ष्म कथा

मराठी लघुकथा संग्रह

अती सूक्ष्म कथा


जगायचं विसरलेल्या,
लख्ख प्रकाशात 
दिवा घेऊन 
जगण्याचा 
प्रयत्न करणार्‍या 
नर-मादीच्या कथा...

कुणाल मदन हजेरी

रु.70

buy book at Amazon :

ATI SUKSHMA KATHA

by Chetak Books: https://www.amazon.in/dp/B0B4FY7GW5/ref=cm_sw_em_r_mt_dp_MTBDZVDP5NCZXNT7D6QH


#chetakbooks #marathibook #marathi book publisher #marathi story for reading 

नीतिशास्त्र, सत्यनिष्ठा आणि अभिवृत्ती

 नीतिशास्त्र, सत्यनिष्ठा आणि अभिवृत्ती  UPDATED ON 10 JAN 2023