updated on 6 Jan 2023
Wednesday, 28 December 2022
Sunday, 25 December 2022
Monday, 21 November 2022
इतिहास NCERT सार
आवृत्ती : २०२३
पान क्रमांक २४०
३) उठावास सुरुवात आणि वाटचाल
मुद्दा क्र ४.
यामध्ये श्री. मंगल पांडे यांना फाशी दिल्याची तारीख ८ एप्रिल १८५७ अशी वाचावी.
करेक्शन लक्षात आणून दिल्या बद्दल आभार : श्री.
last update on 18 March 2023
Thursday, 30 June 2022
निरंजन घाटे यांची पुस्तके
निरंजन घाटे यांची पुस्तके
1. झू : निरंजन घाटे
विज्ञानकथा :
हा प्रकार मराठी भाषेत आत्ताशी कुठं रुजायला सुरुवात झाली आहे.
परंतु पाश्चात्य वाङ्मयात गेली किमान दोन शतके तरी, विज्ञानकथा सातत्याने लिहिली जात आहे.
तिकडे अशा कथांचे अनेक संग्रह आणि शेकडो कादंबर्या आजवर खूप लोकप्रिय झाल्या आहेत. अशाच लोकप्रिय पण दर्जेदार इंग्लिश, अमेरिकन आणि रशियन कथांची चोखंदळपणे निवड करून श्री. निरंजन घाटे यांनी केलेले त्यांचे प्रत्ययकारी अनुवाद या पुस्तकात संकलित केले आहेत. मूळ लिखाणाला प्रामाणिक राहून केलेले हे अनुवाद, मुळच्या इतकेच सरस उतरले आहेत याचा रसिक वाचकाला संग्रहातील कथा वाचून प्रत्यय येईल याची खात्री आहे. कदाचित शेकडो वर्षे रुजल्यामुळे असेल, पण इंग्लिश-अमेरिकन विज्ञानकथेत नाविन्य, वैचित्र्य आणि विविधता खूपच आढळते. त्याचे एक नमुनेदार मराठी सँपल’ असा मान हा संग्रह निश्चितच पटकावेल याची खात्री आहे.
चेतक बुक्स्
by Chetak Books: https://www.amazon.in/dp/
#chetakbooks #marathibooks #marathi #publisher #booksforlibrary #booksforschool #chetakbook #marathibook #marathibooklovers #pustak #goodreads #niranjanghate #marathibookpublisher #booksof निरंजन घाटे
Sunday, 26 June 2022
सारस्वतांची बखर : विजय तरवडे
साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि वल्ली
: सारस्वतांची बखर
‘कवी तो दिसतो कसा आननी.’ अर्थात आपल्याला आवडलेल्या कवितेचा कवी प्रत्यक्ष कसा दिसतो, याविषयी सर्वांना कुतूहल असते. आणि फक्त कवी नव्हे तर कलाक्षेत्रातील प्रत्येक सेलीब्रिटीबद्दल, त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल रसिकांना कुतूहल असते.
मराठी साहित्यविश्वात चाळीस वर्षे मुक्त भ्रमंती केल्यानंतर विजय तरवडे यांनी प्रत्यक्ष भेटलेल्या साहित्यिकांच्या-संपादकांच्या आणि ज्येष्ठ साहित्यिकांच्या तोंडून ऐकलेल्या अनेक गमतीदार आठवणी-किस्से या पुस्तकात संकलित केले आहेत. इथे वाचकांना साहित्यक्षेत्रातील विविध व्यक्ती आणि विक्षिप्त वल्ली भेटतील आणि हसवतील - प्रसंगी हळवे करतील. निकोप-निर्विष किस्से आणि चुटक्यांनी रंगलेल्या गप्पांची ही चटकदार मैफलच आहे!
चेतक बुक्स्
Friday, 24 June 2022
ट्रेंड्स इन इंडियन कल्चर अँड हेरिटेज : UPSC Books in Marathi
ट्रेंड्स इन इंडियन कल्चर अँड हेरिटेज
(UPSC Books in Marathi)
डॉ. औसफ सईद
अनुवाद : सावनी केळकर
सदर पुस्तक स्पर्धा परिक्षांच्या परिप्रेक्ष्यातून (व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ) भारतीय कला आणि संस्कृती हे महत्त्वाचे विषय हाताळते. यात वास्तुविद्या, संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला, चित्रपट, भाषा आणि साहित्य, सादरीकरणाच्या कला, कारागिरी, जत्रा, उत्सव, आणि धर्म आदीचा सर्वसमावेशक आणि प्रवाही शैलीत परामर्श घेतला आहे. भारतीय संस्कृतीच्या अभ्यासार्थ विद्यार्थ्यांना अनेक ग्रंथ वाचावे लागतात. तो वेळ आणि श्रम वाचवणे व विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी आवश्यक माहिती आटोपशीर आकारात देणे हा या पुस्तकाचा हेतू आहे. सिव्हील सर्व्हिसेस, आयएफएस, स्टेट पब्लिक सर्व्हिस, बीएसआरबी, आयकर आणि एक्साईज इन्स्पेक्टरसाठीच्या आणि इतर परिक्षा देऊ इच्छिणार्या उमेदवारांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. पुस्तकाचे तीन भाग आहेत. पहिल्या भागात भारतीय कला आणि संस्कृतीवर पंधरा प्रकरणे आहेत. दुसर्या भागात गेल्या वर्षी सांस्कृतिक क्षेत्रात झालेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आहे. तिसर्या भागात दहा आदर्श प्रश्नपत्रिका, प्रत्येकीत शंभर वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसह दिले आहेत. भारतीय संस्कृती आणि वारशाचा अभ्यास करू इच्छिणार्यांना देखील हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल.
Wednesday, 22 June 2022
मराठी कविता संग्रह : मोशनल, मोटिव्हेशनल आणि इमोशनल
मराठी कविता संग्रह
(कविता संग्रह)
मानवी मन नेहमी भावना व बुद्धी यांच्या हिंदोळ्यावर झुलत असते. आपण समाजात राहतो. तर्हेतर्हेच्या व्यक्ती व वल्ली भेटतात, हृदयात घर करतात. तसेच काही घटना मनाच्या पटलावर कायमच्या कोरल्या जातात. त्या ही ठरतात मोशनल, मोटिव्हेशनल तर कधी इमोशनलही करून जातात. कधी कधी घर, कुटुंब आणि आपल्या नोकरी व्यवसायामुळे सहवासात येणार्या व्यक्ती आपल्या स्वभावाला कारणीभूत ठरू शकतात काही प्रमाणात, कारण आपल्या अदीम प्रभावी प्रेरणाच आपले वर्तन निश्चित करत असतात. त्यावर महापुरुषांचाही प्रभाव असतो. त्यामुळे एकंदर जीवनाकडे व समाजाकडे पाहण्याची दृष्टी, विचार करण्याची पद्धत ठरते प्रेरक, ती तुम्हाला गतिशील बनवून जीवनात प्रवाही ठेवते तर भावनिक बनवून गुंतवूनही ठेवते स्वत:मध्ये. दोन्ही बाबी गतिशीलता आणि भावनिकता यांचे संतुलन जीवनाला आनंद देत असावेत. प्रवास तर करायलाच हवा, पण प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर प्रवासातील ठिकाणांजवळ थोडा विसावाही घ्यायला हवा.
चेतक बुक्स, पुणे 30.
Monday, 20 June 2022
मी 'न'कलाकार : प्रकाश पारखी
आत्मचरित्र
व्यक्तिमत्त्व विकासासाठी गरज असते गुरुची, शिक्षकांची, माता-पित्यांची.
याबरोबरच नाट्यप्रशिक्षण हे देखील व्यक्तिमत्त्व विकासात मोलाची कामगिरी करते.
प्रत्येक व्यक्ती एक कलाकार म्हणून जरी उदयास आली नाही तरी हे प्रशिक्षण जीवनातील विविध वाटांवरचा प्रवास करताना महत्त्वपूर्ण ठरेल. याच प्रवासासाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे प्रकाश पारखी आणि त्यांची संस्था 'नाट्यसंस्कार कला अकादमी' हे नाव केवळ पुण्यात, महाराष्ट्रातच नाही तर या आयामाबाहेरही सर्वदूर पसरले आहे. त्यांच्या घडण्याच्या आणि घडविण्याच्या प्रकियेचा हा अनुबंध म्हणजेच मी 'न'कलाकार हे पुस्तक होय. जीवनातील नाटकाचे महत्त्व अधोरेखित करण्यालाही हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
चेतक बुक्स्, पुणे 30.
Wednesday, 8 June 2022
वाडगं : आत्मकथन : अनिल भालेराव
वाडगं
(आत्मकथन)
अनिल भालेराव
या आत्मकथनाची अनेक वैशिष्टे आहेत. साधी सोपी सरळ संवादी भाषा
आणि जे काही अनुभवले त्याचे प्रामाणिक स्पष्ट निवेदन.
व्यवस्थेविरोधात आक्रोष देखील संयमी आहे.
उगीच शब्दखेळ आणि रंगीत चित्रण नाही.
त्यात एक तटस्थता आणि प्रामाणिकपणा दिसून येतो.
त्यामुळे सारी पात्र वाचकाला भेटल्यासारखी वाटतात.
खानदेश आणि मराठवाडा भागातील बोलीचा संवादी उपयोग आहे.
या भाषेतील अनेक शब्दांचे भावार्थ दिल्याने वाचकाला त्याचे
अर्थ कळण्यास मदत होते.
चेतक बुक्स्, पुणे 30.
नीतिशास्त्र, सत्यनिष्ठा आणि अभिवृत्ती
नीतिशास्त्र, सत्यनिष्ठा आणि अभिवृत्ती UPDATED ON 10 JAN 2023
-
नीतिशास्त्र, सत्यनिष्ठा आणि अभिवृत्ती UPDATED ON 10 JAN 2023
-
updated on 6 Jan 2023