मराठी कविता संग्रह
(कविता संग्रह)
मानवी मन नेहमी भावना व बुद्धी यांच्या हिंदोळ्यावर झुलत असते. आपण समाजात राहतो. तर्हेतर्हेच्या व्यक्ती व वल्ली भेटतात, हृदयात घर करतात. तसेच काही घटना मनाच्या पटलावर कायमच्या कोरल्या जातात. त्या ही ठरतात मोशनल, मोटिव्हेशनल तर कधी इमोशनलही करून जातात. कधी कधी घर, कुटुंब आणि आपल्या नोकरी व्यवसायामुळे सहवासात येणार्या व्यक्ती आपल्या स्वभावाला कारणीभूत ठरू शकतात काही प्रमाणात, कारण आपल्या अदीम प्रभावी प्रेरणाच आपले वर्तन निश्चित करत असतात. त्यावर महापुरुषांचाही प्रभाव असतो. त्यामुळे एकंदर जीवनाकडे व समाजाकडे पाहण्याची दृष्टी, विचार करण्याची पद्धत ठरते प्रेरक, ती तुम्हाला गतिशील बनवून जीवनात प्रवाही ठेवते तर भावनिक बनवून गुंतवूनही ठेवते स्वत:मध्ये. दोन्ही बाबी गतिशीलता आणि भावनिकता यांचे संतुलन जीवनाला आनंद देत असावेत. प्रवास तर करायलाच हवा, पण प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर प्रवासातील ठिकाणांजवळ थोडा विसावाही घ्यायला हवा.
No comments:
Post a Comment