‘कोंडमारा’ हा सौ. वंदना हुळबत्ते यांच्या एकूण संकलित केलेल्या कवितांचा पहिलावहिला संग्रह आहे. त्यामुळे यात पहिल्या लेखनाच्या खाणाखुणा जाणवणे हे तसे स्वाभाविक म्हटले पाहिजे. तशा त्या आपल्याला जाणवतीलच. पण त्याचबरोबर आणि त्याच वेळी आपणास त्यांच्या कवितेतील साधकबाधक गुणवत्तेची पण जाणीव होऊन आनंद वाटेल असे वाटते. साधकबाधक याकरिताच म्हणावेसे वाटते की, त्यांच्याठायी कवितेची, म्हणजेच कवितेच्या विषयाची आणि रचनेची अशी एक अंतर्गत जाण आहे हेही त्याचवेळी जाणवेल. त्यांची काव्यरचना त्या अर्थाने कोणत्याही रसिकाला आशादायक वाटावी अशीच आहे. भविष्यात त्यांची ही समज आणखीनच गती घेऊ शकेल असा विश्वास प्रकट करण्याइतपत ही समज आढळून येते. त्यांचा हा काव्यसंग्रह आपणास हेच सांगतो आहे. या संग्रहाला कोंडमारा हे शीर्षकच अत्यंत सार्थ आहे असे वाटते. हा कोंडमारा केवळ व्यक्तिगत पातळीवरील नसून त्याचवेळी तो सामाजिक स्तरावरीलपण आहे. हा एक प्रकारचा स्त्रीमनाचा, स्त्रीजाणिवांचा कोंडमारा आहे.
- वैजनाथ महाजन
चेतक बुक्स, पुणे 30.
#कवितासंग्रह #मराठीकविता #चेतकबुक्स
- वैजनाथ महाजन
चेतक बुक्स, पुणे 30.
#कवितासंग्रह #मराठीकविता #चेतकबुक्स
No comments:
Post a Comment